Accident

मालवाहू ट्रकच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

श्री.अमित साखरे, उपसंपादक
चामोर्शी-: शहरात सततच्या वाहतूकोंडीमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असताना ८ डिसेंबर रोजी शहरातील आष्टी कार्नर येथे एसबीआय बँकजवळ आष्टी कडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकमध्ये सापडून येथील हनुमान नगरातील मलेश नामक ६५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ वाजताच्या सुमारास घडली.  घटना स्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती , ट्रक ड्रायव्हर भीतीने घटना स्थळावरून फरार झाला.
येथील हनुमान नगरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राहणारे मलेश भिमन्ना कनकुटलावार malesj bhimanna kankutlavar वय ६५ वर्ष हे हरेश गांधी यांच्या राईस मिल मध्ये चौकीदार म्हणून कामावर होते ते आपल्या सायकलने सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास आष्टी कार्नर येथून वळून हरेश गांधी यांच्या मिलवर जाण्यासाठी सायकल वळवत असताना आष्टी कडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक न. सी जी ०७- सी आर ७२९९ मध्ये सापडल्याने  मलेश भिमन्ना कनकुटलावार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यादरम्यान ट्रक ड्रायव्हर घटना स्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल होत अपघात ग्रस्त मालवाहतूक ट्रक ताब्यात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणून मृत्यदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.newsjagar
शहरात वाहतूक कोंडी नेहमी होत असल्याने व आज झालेल्या अपघातामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी आष्टी कार्नर व जूने लक्ष्मी गेट चौकात ब्रेकरची, बॅरिकेट व कायम स्वरुपी ट्रॅफिक पोलिसची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व मृतकाचा पुतण्या सुभाष कनकुटलावार यांनी केली आहे. News Jagar

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत