महिला सक्षमीकरण व सशक्तीकरण द्वारा आदर्श विद्यालयात २०१ सायकलीचे वाटप

गडचिरोली जिल्हा सामाजिक
Unique Multiservice
Share

श्री. विलास ढोरे विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली

देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हाय.तथा कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आज महिला शसक्तीकरण व सक्षमीकरण योजने अंतर्गत मुलींना २०१ सायकलीचे वाटप संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मोतीलाल कुकरेजा हे होते तर विशेष अथिती म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे MLA KRUSHA  GAJABE संस्था उपाध्यक्ष जगदीश शर्मा , होते , संस्था कोषाध्यक्ष मुरलीधर दुफारे , सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल,नानक कुकरेजा सदस्य जहीर शेख ,योगेश नाकतोडे , संतुमल डोडानी ,मुख्याध्यापक प्रा. दामोधर शिंगाडे ,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शन्कर कुकरेजा ,उपमुख्याध्यापक सुलभा प्रधान ,पर्यवेक्षक दीपाली राठोड ,पुरुषोत्तम भागडकर, विलास ढोरे ,रवींद्र बगमारे ,रविकांत विधाते प्रामुख्याने उपस्थित होते.

Distribution of 201 bicycles to Adarsh Vidyalayas by Women Empowerment and Empowerment

यावेळी आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजात समान दर्जा मिळावा व त्या साठी ह्यांना बरोबरीचा दर्जा मिळणे गरजेचे असून त्यामुळे आज शासनाने जे महिलांसाठी धोरणे राबवीत आहे ते कौतुकास्पद आहे त्यामुळे शासनाचे ह्या योजनेचे आभार माणून आज खेडोपाढ्यातून शिक्षणासाठी दलनवळनाच्या फारश्या सुविधा नाहीत त्यामुळे ह्या उपक्रमामुळे ही सुविधा गोरगरीब विध्यार्थिनिना मोफत सायकली देऊन एकप्रकारे तळागाळातील घटकापर्यंत शासनाचे लक्ष आहे,मिळणाऱ्या सुविधा त्याच बरोबर गुणवत्ता संपदाणूक करणे हेही लक्ष ठेवून प्रयत्नरत राहावे असे आवाहन आ.कृष्णा गजबे ह्यांनी केले.
यावेळी कोरेगाव,चोप,आमगाव ,जुनी वडसा, नैनपूर येथील ८ ते १पर्यंतच्या विध्यार्थ्यानीना चांगल्या प्रतीच्या सायकलीचे वाटप करण्यात आहे.
यावेळी ह्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,सायकल लाभार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमांचे संचलन प्रा.पंकज धोटे यांनी तर आभार रेशीम गायकवाड यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत