श्री अमित साखरे उपसंपादक
चामोर्शी: मराठी पत्रकार परिषदच्या वर्धापन दिनानिमित्त येथील पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर ०३ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आला त्यावेळी. येथील अनेक पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली newsjagar
आरोग्य शिबिर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकिय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार कीलनाके यांचे उपस्थित गडचिरोली जिल्हा मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले , याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉ. विधान देवरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली कुडवे, डॉ. दिपिलता देऊरी , डॉ. हुडा खान, डॉ. वर्षा कापगते, समुपदेशक राजेंद्र अल्लीवार, नागेश मादेशी, पुरुषोत्तम घ्यार, अधीपरीचारिका शुभांगी गडकर, सुकेशनी आत्राम, सुप्रिया मेश्राम, ज्योती पिजुलवार, तमिश राऊत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्राजक्ता फापंवाडे, रीमा मेश्राम, रीना रॉय, गिरीश पाटील आदी उपस्थित राहून सहकार्य केले तर यावेळी शिबिरात चंद्रकांत बुरांडे, बबन वडेट्टीवार, गजानन बारसांगडे, चंद्रकांत कुनघाडकर, अमित साखरे, विनोद खोबे, कालिदास बुरांडे, नरेश सोमणकर, अरुण गव्हारे आदी पत्रकारांची इसिजी, शुगर, बी पी, रक्त तपासणी, दंत तपासणी आदी तपासणी करण्यात आली
बॉक्स -: ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीणकुमार कीलनाके यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकाराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे तेव्हाच सामान्य माणसाला न्याय मिळेल असे मत व्यक्त केले . यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.