नागपूर: भारतीय हवाई दलाच्या (IAF) सार्जंटने कर्तव्यावर असताना रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरफोर्स नगर नागपुर येथे घडली. newsjagar
जयवीर सिंग असे आत्महत्या केलेल्या सार्जंट चे नाव आहे , ते रात्री उशिरा अल्फा 8 गार्ड चौकीवर ड्युटीवर असतांना पहाटे मध्यरात्री १ .३ ० च्या सुमारास त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडण्यामुळे त्याचा तत्काळ मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज ऐकून मेंटेनन्स कमांड सेंटरचे कर्मचारी संरक्षक कक्षाकडे धावले, तेथे त्यांना जयवीर सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आणि गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहेत. News Jagar