भामरागड पर्लकोठा, ताडगाव नदीवरील पुलावर स्फोटके. स्फोटक निकामी करतांना एक स्पोट झाले मात्र.. जीवित हानी नाही.

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र सामाजिक
Unique Multiservice
Share

जावेद अली, गडचिरोली

गडचिरोली भामरागड आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (I.E.D)पेरून ठेवल्याची विश्वसनीय गोपनिय माहिती मिळाली होती. News Jagar
त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले.शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.

 

सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत