amit shaha news jaagr

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा

गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय
Unique Multiservice
Share

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी 15 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर दुपारी 4 वाजता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची जाहीर सभा. महायुतीचे उमेदवार संघटित झाले आहेत. अमित शहा हे देशातील सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली गृहमंत्री म्हणून ओळखले जातात. गुन्हेगारांना जेरबंद करून देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अमित शहा यशस्वी झाले आहेत. चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर दुपारी ४ वाजता अमितजी शाह चंद्रपूरवासीयांशी संवाद साधतील. news jagar
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेत विकासाला आणखी गती मिळाली आहे. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांनी भाजप महाआघाडीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा व चंद्रपूर महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत