बाजार समिती मध्ये झालेल्या पदभरती घोटाळयाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा -सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

बाजार समिती मध्ये झालेल्या पदभरती घोटाळयाची सखोल चौकशी करून दोषींवर करा -सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथे २१ जानेवरी रोजी झालेल्या पदभरती परिक्षेत मोठा घोटाळा झालेला आहे. सदर घोटाळा होण्याची शक्यता पूर्वीपासूनच असल्यामुळे या बाबतचे निवेदन दि.१७/०१/२०२४ चा दिवशी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले होते तरी त्यावर कसलीही कारवाई झाली नाही. ज्याप्रकारे परिक्षा घेण्यात आली तीसुध्दा संशयास्पद होती प्रश्न पत्रिका सीलबंद नव्हत्या, उत्तरपत्रिका ही सुमार दर्जाच्या होत्या व विद्यार्थ्यांना ओ.एम.आर. कॉपी शिट पुरवण्यात आल्या नाहीत, पर्यवेक्षांकडे कसलेही ओळखपत्र नव्हते या सर्व वाबींना लक्षात घेउन विद्यार्थ्यांनी २१ जानेवरी २०२४ रोजी परिक्षा झाल्यानंतर देखील मा. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दिनांक २३/०१/२०२४ रोजी विद्यार्थ्यांची गुणसुची प्रसिध्द करण्यात आली त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा पदाधिकाऱ्याचे निकटवर्तीय व नातेवाईक यांनाच सर्वात जास्त गुण आहेत व तेच नियुक्त होणार आहेत हा गरीब व मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे जे विद्यार्थी नियुक्त होतील त्यांची व परिक्षा घेणाऱ्या संस्थेची देखील चौकशी झाली पाहिजे. जो पर्यंत हि चौकशी होत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थी व पालक तहसिल कार्यालय सिरोंचा समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत ,असा इशारा यावेळी सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी श्री.सतीश जवाजी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत