निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

गडचिरोली जिल्हा नागपुर महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

 

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

गडचिरोली दि.५: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. राजेंद्र कुमार कटारा(भाप्रसे)यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.यावेळी भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार व राजकीय पक्षाकरिता भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अतिमहत्त्वाच्या सूचना देण्याकरिता ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचे दालनात ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी) अमित रंजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार(गडचिरोली)संतोष आष्टीकर उपस्थित होते.
विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची विस्तृत माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीने निवडणुकीकरिता उभे असलेल्या उमेदवारांचा खर्च नियमित सादर करावा,खर्चाची नोंदवही अद्यावत ठेवावी,निवडणुकी संदर्भात आचार संहितेचा भंग होत असल्यास सी-व्हिजिल ॲप्सचा उपयोग करून किंवा नियंत्रण कक्षात तक्रार दाखल करता येईल, ईव्हीएम यंत्राच्या दुसऱ्या सरमिसळ प्रक्रियेसाठी तसेच मतदान यंत्र तयार करते वेळेस अभिरूप मतदानाकरिता उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीने विहित वेळेत उपस्थित राहावे आदींसह इतर आवश्यक सूचना उपस्थित राजकीय प्रतिनिधींना देण्यात आल्या.
सभेस इंडियन नॅशनल काँग्रेसचे सतिश विधाते, भारतीय जनता पार्टीचे सतिश चिचघरे, बहुजन समाज पार्टीचे भास्कर मेश्राम ,वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रशांत मडावी , पीझन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे श्यामसुंदर उराडे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दिनांक:५.११.२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत