attack on youth with sharp weapon- 4 booked
न्यूज जागर वृत्तसेवा
घराकडे जात असतांना महिला सभागृहाजवळ शम्मीकांत डोर्लीकर वय 45 वर्षे रा. मूल याचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल येथे गुरूवारी सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सदर हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर AAKASH YESANKAR (32), आनंद येसनकर AANANAD YESANKAR (34), निशांत मेश्राम NISHANT MESHRAM (32) आणि रितीक शेंडे RITIK SHENDE (27) सर्व रा. विहीरगांव मूल यांनी केला असल्याचे कळते त्यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
मूल येथील शम्मीकांत डोर्लीकर यांनी रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेलचे बांधकाम सुरू केलेले आहे. सदर हॉटेलचे बांधकाम बघुन डोर्लीकर घरी जात असताना प्रमोद बांबोळे यांच्या घराजवळ आकाश येसनकर (32), आनंद येसनकर (34), निशांत मेश्राम (32) आणि रितीक शेंडे (27) रा. विहीरगांव मूल यांच्यात जुन्या भांडणातुन वादविवाद झाला, यातील एकाने धारधार शस्त्राने शम्मीकांत डोर्लीकर यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले, दरम्यान शम्मीकांत डोर्लीकर यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर पाठविण्यात आलेले आहे.
सदर घटनेची मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन तक्रारीवरून आकाश येसनकर (32), आनंद येसनकर (34), निशांत मेश्राम (32) आणि रितीक शेंडे (27) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत, SHIVAJI BHAGAT पोलीस निरीक्षक सुमित परतेकी SUMIT PARTEKI यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम VARSHA NAITAM करीत असून , बातमी लिहीपर्यंत सर्व आरोपी फरार असल्याचे कळले आहे.