जावेद अली गडचिरोली
गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना बनवा अशी मागणी अहेरी चे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस, अजितदादा पवार गट. नागेश मडावी व कार्यकर्ता प्राचार्य रतन दुर्गे यांनी केली आहे.
मागील 5 वेळा आमदार म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्रात जनतेनी भरघोस मताने निवडून आले व मागील वर्ष गोंदिया जिल्याचे पालकमंत्री पद भूषविले असून अनेक विकास कामे केली आहेत . अहेरी विधानसभा क्षेत्रांचा विकासाला गती मिळेल या मुळे धर्मराव बाबा आत्राम यांना गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री पद दयावे अशी मागणी केली आहे. गडचिरोली जिल्हा हा अती मागास जिल्हा असून आरोग्य. सिंचन. शिक्षक. रोजगार. रोड व रस्ते या विकासा करीता धर्मराव बाबा आत्राम यांना पालकमंत्री पदी निवड करण्यात यावे अशी मागणी नागेश मडावी तालुका अध्यक्ष. राका चे कार्यकर्ता प्राचार्य रतन दुर्गे. सांबय्या हिचामी तालुका अध्यक्ष एटापल्ली. मधुकर कोल्लूरी सिरोंचा तालुका अध्यक्ष. रमेश मागनोवार भामरागड. उद्धीट बिस्वास मुलचेरा . मनिष दुर्गे कार्यकारी अध्यक्ष एटापल्ली. सरपंच कमल तोरेम. पुस्पा अलोणे जिल्हा महिला अध्यक्ष गडचिरोली. बालाजी गावंडे. इंदरशा मडावी माजी जी. प सभापती गणिभाई शेख सामाजिक कार्यकर्ता . रवी गुडिमेटला आसरली. श्रीनिवास कावडे सरपंच उमानूर. विनोद आलाम उपसरपंच. श्रीमती आत्राम खांदला राजाराम. माजी सरपंच रमेश मडावी.यांनी मागणी केली आहे