धनगर समाजाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने करण्यात आलेला सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सार्वत्रिक करण्याची केली विनंती
गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल महोदय यांना भेटून दिले निवेदन
दिनांक 4 ऑक्टोंबर गडचिरोली
ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या वतीने आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनावर दबाव टाकून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे . परंतु राज्यातील महायुतीचे सरकार अनुसूचित जमाती मधून धनगर समाजाला आरक्षण देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. परंतु तरीही यतकदाचित तसा निर्णय झाल्यास आदिवासी समाजाची मोठी नाराजी सहन करावी लागेल. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी यांची गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन देऊन केली.