श्री. अमित साखरे, उपसंपादक
चामोर्शी:- गेल्या दोन दिवसापूर्वी येथील एका कुणबी समाजाच्या संस्थेने ऐका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत पत्रका द्वारे तालुक्यातील कुणबी समाजाला पाठवीत आहेत त्या पार्श्भूमीवर तालुक्यातील विविध गावातील कुणबी बांधवांनीकाल घारगाव येथील गजानन महाराज मंदिरात विविध गावातील कुणबी समाज बांधवांनी बैठक घेत ‘त्या ‘संस्थेनी घेतलेला निर्णय मान्य नसून आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे विविध गावातील कुणबी समाज बांधवांनी जाहीर केले आहे newsjagar
दोन तीन दिवसांपूर्वी येथील जगतगुरू तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशीय संस्थे द्वारा आगामी विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या डॉ, सोनल कोवे अपक्ष महीला उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत तालुक्यातलं कुणबी समाजाला पत्रक काढून पाठवीत आहेत मात्र ती संस्था समाजकरण करीत नसून राजकारण करत आहे , ही संस्था कुणबी समाजाचे निर्णय घेणारी संस्था नाही. नसतांना समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे आहे. कुणबी समाज हा राजकारण व समाजकारण करीत असतो हा समाज प्रत्येक पक्षात असताना ती संस्था ऐका अपक्षाला पाठिंबा जाहीर करते News Jagar
त्यां संस्थेची घेतलेला निर्णय तालुक्यातील कुणबी समाजाला मान्य नाही ते समाजाला वेठीस धरू शकत नाही त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत असल्याचे आज घारगावर येथे विविध गावातील शेकडो समाज बांधवांनी घेतलेल्या बैठकीत जाहीर केले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधवांनी त्याच्या त्या पत्रकाला विरोध करून महाविकास आघाडी उमेदवाराच्या पाठीशी रहावे असेही कुणबी समाज बांधवांनी आवाहन
केले या बौठकीला हे कुणबी समाजाचे प्रमोद भगत, शिवसेना उबाठा चे तालुका अध्यक्ष मनोज पोरटे , दिगांबर धानोरकर, राहुल पोरटे, कालिदास पाल, सदानंद जवादे, सत्यवान कुथे, सुधीर शिवणकर, विवेक भगत, लोमेश्र्वर भगत, जानकिराम पोरटे, , रवींद्र पाल, राजेश्वर लांबाडे, मुकुंदा आभारे, बालाजी झोडक, नमुचंद भिवंकर, आशिष म्हाशाखेत्री आदीसह शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते.
बॉक्स -: या बौठकीत तालुका काग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी तालुक्यातील समाज बांधवांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला ही समाजासाठी अभिमानाची बाब असून समाजानी महाविकासआघाडी उमेदवाराला उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून निवडून आणावे असे आवाहन केले