crime

तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांवर पोस्टे कुरखेडा येथे गुन्हा दाखल 

BREAKING NEWS CRIME गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share
जावेद अली गडचिरोली
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षिततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते.  मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 27/11/2024 रोजी चे 00.01 वा. पासून ते दिनांक 11/12/2024 चे रात्रो 24.00 वा. पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.  असा आदेश असतांना देखील दि. 30/11/2024 रोजी चे रात्री 12.00 वा दरम्यान पोस्टे कुरखेडा हद्दीतील गोठणगाव नाक्याजवळ काही तरुणांनी एकत्र येवुन गोंधळ/आरडाओरड करुन अवैधरित्या तलवार बाळगुन त्या तलवारीने केक कापला असल्याबाबतची गोपनिय माहिती कुरखेडा पोलीसांना मिळाली. त्या अनुषंगाने अधिकची चौकशी केली असता, सोशल मिडीयावरील व्हिडीओमध्ये सदर तरुण तलवारीचा वापर करुन केक कापत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.  तरुणांनी केलेल्या कायद्याच्या उल्लंघनामुळे तसेच सदर शस्त्राचा वापर करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीसांनी तलवारीसहित सदर तरुणांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर पोस्टे कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. newsjagar
सदर कार्यवाही मध्ये एक धारदार टोकदार तलवार अंदाचे किंमत 1500/- रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) तौसिफ रफीक शेख, वय 36 वर्षे, 2) अशफाक गौहर शेख, वय 34 वर्षे, 3) परवेज फिरोज पठाण, वय 25 वर्षे, 4) शाहरूख नसिम पठाण, वय 25 वर्षे रा. राणाप्रताप वार्ड, कुरखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध व व्हिडीओमधील इतर सर्व आरोपीतांविरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959, सहकलम 37 (1) (3), 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्राची कायदेशिर कार्यवाही मा. वरीष्ठंाचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा येथील मपोउपनि. वर्षा बोरसे ह्रा करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कुरखेडा प्रभारी अधिकारी पोनि. महेंद्र वाघ, मपोउपनि. वर्षा बोरसे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत