डॉक्टरांच्या हलगर्जीने बाळंतणीचा मृत्यू -कुटूंबियांचा आरोप

गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी सामाजिक
Unique Multiservice
Share

आदिवासी महिला  कविता नीलेश कोडापे यांच्या मृत्यूसाठी रुग्णालयातील डॉक्टरांना जबाबदार धरून गडचिरोलीच्या मार्कंडेय रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी एकता युवा समिती या आदिवासी तरुणांच्या संघटनेने केली आहे.

आज दुपारी येथील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,  प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे 6 डिसेंबर रोजी डॉ. प्रशांत चलाख आणि डॉ. वैशाली चलाख यांच्या मालकीच्या मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात केले डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर सर्व काही ठीक असल्याचे सांगितल्याने ती महिला परत जाण्यास तयार होती परंतु ऑपरेशन च्या सुख सोइ उपलब्ध नसतांना फक्त पैशाच्या लालसेपोटी डॉक्टरांनी रुग्णालयातच राहण्याचा आग्रह धरला. डॉक्टरांनी त्याच रात्री महिलेला कात्री लावली आणि मुलगी झाली.

रात्री अकराच्या सुमारास डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जातांना बघून डॉक्टर दाम्पत्त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलला नेण्याचा ऐनवेळी सल्ला दिला, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. तिला दिव्य रुग्णालयात दाखल केले असता सकाळी ११.३० ला च्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील तर तिला कात्री का लावण्यात आली, असा सवालही पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या कविता यांच्या पतीने केला. कविता यांची प्रथम तपासणी केली असता सर्व काही सामान्य होते, तर कात्री लावण्याची घाई का झाली, असा सवालही त्यांनी केला आणि या मृत्यूला डॉ. चलाख दाम्पत्य जबाबदार असल्याचे सांगितले.

कात्री मारल्यानंतर कविताला रक्तस्त्राव सुरू झाला आणि डॉक्टर चलाख यांच्या लक्षात आले की केस गुंतागुंतीची झाली आहे, त्यांनी ऑक्सिजनचे कारण देत रुग्णाला हलविण्याचा सल्ला दिला. डॉ.चालख यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेत कोणतीही सुविधा नव्हती. अशा प्रकारे डॉक्टरने रुग्णाच्या जीवाशी क्रूर खेळ केला, असा आरोप पतीने केला आहे.

गडचिरोलीतील अनेक सामाजिक संघटनानी या विरुद्ध आवाज उठविल्यामुळे सर्व जिल्हा वासियांचे या घटनेकडे लक्ष वेधून घेतले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत