श्री . नंदकिशोर वैरागडे, गडचिरोली जिल्हा विशेष प्रतिनिधी
70 हजार शिक्षक/कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
राज्यभर जवळपास 70 हजार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अंशतः अनुदानीत शाळेत अल्प वेतनावर काम करीत वेठबिगारीचे जीवन जगत आहे .वाढीव टप्प्यावाढ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले.विशेष म्हणजे कोल्हापूर व मुंबई येथे गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन सुरूच आहे त्याची दखल घेत आज कॅबिनेट च्या बैठकीत वाढीव टप्प्यावाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गडचिरोली जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांनी दीली.
राज्यात जवळपास 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अल्प वेतनावर म्हणजेच 20% 40% 60% वर काम करीत आहेत.सातत्याने कृती समिती व समन्वय समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेत 12 जुलै 2024 ला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशन काळात सभागृहात जून 24 पासून राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतनाचा २० टक्के वाढीव टप्पा देण्यात येईल अशी घोषणा केली, परंतु शासन निर्णय निर्गमित न केल्यामुळे राज्यातील जवळपास 70 हजार शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली होती .शेवटी टप्प्यावाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी म रा कायम विनाअनुदानित शाळा कृती समीतीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदळे यांनी उपोषणाचे शस्त्र सुध्दा उगारले शेवटी आज टप्प्यावाढ करण्याच्या मागणीला आज कॅबिनेट मधे मंजुरी देण्यात आली.ह्या निर्णयाचा राज्यातील 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभ होणार आहे.
15 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरवून मराठी शाळा बंद पडणार की काय अशी अवस्था निर्माण होत असल्याने 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करावा, अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह इतर लाभ देण्यात यावे आदी मागण्यासाठी सुध्दा हे आंदोलन सुरू होते .
आजच्या निर्णयाचे कृती समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष बोरकर सर, सचिव मुरलीधर नागोसे सर , अविनाश भट सर, ताटावार सर, मिस्त्री सर, भुरे सर, पत्रे सर, कुणघाटकर सर, चंदनखेडे सर, मारगाये सर, भैसारे सर नवेगावं, बावणे सर, रामटेके मॅम, आणि कोल्हापूर च्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी बांधवानी
अभिनंदन केले.