जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच उपविभागीय अधिकार्याकळे तीन तालुक्यातील प्रभा
जावेद अली गडचिरोली
गडचिरोली जिल्हा हा विकासा पासून कोसो दूर त्यात एक अधिकारी बघतो तीन तालुक्यातील प्रभार गडचिरोली. अहेरी. सिरोंचा अतिशय नवल वाटाव अशी या सरकार व प्रशाषणाची दयनीय अवस्था जिल्हा परिषद बांधकाम विभागात गडचिरोली वरून 100 की मी अंतर अहेरी. तर गडचिरोली वरून 200 किमी अंतर सिरोंचा असून एक अधिकारी गडचिरोली. अहेरी. सिरोंचा तालुक्यातील कसे काय काम बघणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागात करोडो चे विकास कामे सुरु असून एक अधिकारी कसे काय लक्ष देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकतेच आमदार म्हणून निवडून आलेले राजे धर्मराव बाबा आत्राम या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकळे लक्ष देऊन विकास कामावर लक्ष देण्यात करिता उपविभागीय अधीकारी यांची स्वतंत्र नियुक्ती करतील का असा सवाल करीत आहे. गडचिरोली जिल्यातील करोडो ची निधी येत असून योग्य त्या प्रमाणात खर्च जर होत असेल तर ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रमानात विकास का होत नाही. प्रत्येक कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनता करीत आहे.अहेरी तालुक्यात एकूण 40 च्या जवड पास ग्रामपंचायत असून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लाखोचे कामे सुरु आहे तर उपविभागीय अधिकारी अहेरी राज नगरी च्या 40 ग्रामपंचायत च्या विकास कामाकळे लक्ष देत आहे का. तसेच गडचिरोली. व सिरोंचा येथील विकास कामे कस्यापद्धतीने बघत असेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनता करीत आहे.