आमीत साखरे, उपसंपादक, न्यूज जागर
चामोर्शी – केवट ढिवर समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती दिनाचा कार्यक्रम १७ ऑक्टोबर रोज गुरुवारला केवट ढिवर समाज संघटना तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवा निमित्त महर्षी वाल्मिकी मंदिर चौक सांस्कृतिक भवन जुनी मच्छी मार्केट केवट मोहल्ला येथे दि. १६ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व विविध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम , पुजाआर्च्या ,भजन,गोपाल काला व महर्षी वाल्मिकी रुषीची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
पालखी मिरवणूक महर्षी वाल्मिकी चौक जूनी मच्छी मार्केट येथून सुरुवात करून ते शिवाजी चौक , मुख्यबाजार पेठ, चवडेश्वरी माता मंदिर , माऊली माता मंदिर ते महर्षी वाल्मिकी चौकात पालखी ची समाप्ती करण्यात आली .
यावेळी अध्यक्ष परशुराम सातार , उपाध्यक्ष सुभाष सरपे , सचिव विलास सरपे ,कान्हु कोसमशिले ,मच्छिंद्र सातारे , राजेश राऊत ,सुरेश गद्दे ,महेश शिंदे, मंदाताई मंडरे ,नारायण कस्तुरे ,संदीप शिंदे ,मधुकर गेडाम ,विशाल कस्तुरे , सागर चापले , अक्षय राऊत , राहुल भंडारे ,गयाबाई राऊत , वनमाला सरपे , सुमित्रा शिंदे , सीमा सातारे , सखुबाई कस्तुरे , गवरुबाई कस्तुरे , शशीबाई सातारे , महादेव कोसमशिले, दिवाकर भंडारे , नितेश शिदे , संजय शिंदे ,केशव राऊत , मारोती सातारे सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
. . . . . . . . . .
मिरवणुकीतील खासआकर्षण महर्षी वाल्मिकी यांची सजवलेली झॉकी , लव कुश सिता माता यांची झाकी,महर्षी वाल्मिकी यांची फोटोची प्रतिमा असलेली झॉकी यांचे आकर्षण होते .
. . . . . . . . . . . . .
विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण –
रांगोळी स्पर्धा -प्रथम क्रं – काजल शिंदे,द्वितीय क्रं – सुप्रिया सरपे, तृतीय क्रं. -पुनम राऊत
निबंध स्पर्धा -प्रथम क्रं. – नेहा वाघाडे , द्वितिय क्रं. – पूर्वी सरपे , तृतीय क्रं. – सुप्रिया सरपे
संगीत खुर्ची स्पर्धा -प्रथम क्रं – स्वरा गेडाम ,द्वितीय क्रं. – रितिक शिंदे , तृतीय क्रं. – पल्लवी शिंदे तर महिला मधून भारती गेडाम .
चित्रकला स्पर्धा -प्रथम क्रमांक – धीरज मंडरे, द्वितीय क्रमांक – आशिष वाघाडे , तृतीय क्रमांक – पूनम राऊत
सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा -प्रथम क्रमांक – तनिषा गद्दे, द्वितीय क्रमांक – स्वरा गेडाम ,तृतीय क्रमांक – खुशबू शिंदे तर समुह नृत्य स्पर्धेत -प्रथम क्रमांक – प्रतीक्षा कोसम शिले ग्रुप ,द्वितीय क्रमांक – माही सातारे ग्रुप ,तृतीय क्रमांक – अमृता मंडरे ग्रुप
वक्तृत्व स्पर्धा -प्रथम क्रमांक पूर्वी सरपे या सर्व स्पर्धकांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र ,रोख रक्कम व प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सर्व स्पर्धकांना गौरविण्यात आले . कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .