घाटेअळी व अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालेल्या धान उत्पादकांना सरसकट नुकसान भरपाई द्या. निवेदनाद्वारे गीता बोरकर यांची मागणी.

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र शेती
Unique Multiservice
Share

नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती धानपिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या धानपिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट असुन हाती आलेले धानपिक आधी घाटेअळी च्या आक्रमणाने मातीमोल होत असतांनाच . अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणून धान मातीमोल केले आहे . शेतकऱ्यांनी धानपिकाकरीता बँक,आदिवासी सेवासोसायटी तर खाजगी सावकार कडून कर्ज काडून पिकाची लागवड केली.यावर्षीच्या खरीप हंगामातील धानपिकावर लागवडी पासूनच किटकनाशक फवारणी व खत व्यवस्थापनाचा खर्च करून धानपीकावरील रोग आटोक्यात आणून चार महिने पर्यंत धानपिकाचे संगोपन करून पीक ‘डोलत होते.अगदीं धानकापनीच्या वेळीं घाटेअळीने कहर केल्याने पीक जमिनदोस्त होतं असल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंत्ताग्रस्त होत होता. कूषीविभागाच्या मार्गदर्शनाखाली उभ्या धानपिका वरती कीटकनाशके फवारणी सुरु होते. तर काही शेतकरी धान पीक कापून कडपा शेतामध्ये ठेवलेल्या होत्या .अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या हातवर आलेले पीक मातीमोल केल्याने कर्ज कसे पेंडायचे शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे. त्यामुळे धानउत्पादन शेतकऱ्यांना त्वरित सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी गिरगांव ग्रामपंचायत सरपंच्या गीता बोरकर यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत