ग्राम पंचायत सदस्य व कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

चंद्रपूर जिल्हा नागपुर महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

नामदार सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मूल (प्रतिनिधी): जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मूल तालुक्यात गेल्या काही वर्षापासुन झालेल्या विकासकामांवर प्रभावीत होवुन मूल तालुक्यातील कांतापेठ येथील ग्राम पंचायत सदस्य दिपक सातरे, कॉंग्रेसचे कार्यकर्ते निखिल बोमनवार, विनोद गावतुरे यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

राज्याचे कॅबीनेट मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हयात विकासाची गंगा वाहत आहे. सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार याप्रमुख विषयांवर त्यांनी अनेक लोखाभिमुख काम केलेले आहे. तालुक्यात पायलट आणि आर्च बंधाÚयांमुळे अनेक शेतकÚयांना दुबारपेरणीची संधी मिळालेली आहे, चिरोली-केळझर जिल्हा परिषद क्षेत्रात न भुतो न भविष्यती असे विकासकामे पुर्ण केल्याने कांतापेठ येथील ग्राम पंचायत सदस्य दिपक सातरे, कॉंग्रेसचे कार्यकर्ते निखिल बोमनवार, विनोद गावतुरे यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मूल येथे भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. नामदार मुनगंटीवार यांनी त्यांच्या गळयात भाजपाचा दुप्पटा टाकुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील आयलनवार उपस्थित होते,

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये पक्ष प्रवेश केल्याने भाजपा कार्यकर्त्यांध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत