गणपूर वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबास शासनातर्फे आर्थिक मदत

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

जिल्हाधिकारी संजय मीणा यांची माहिती

चामोर्शी दि. 25 : तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटुन 7 महिला व 1 नावी वाहुन गेल्याची दुर्देवी घटना 23 जानेवारी रोजी घडली. या घटनेची शासनाच्या वतीने गंभीर दखल घेतली असून मृतकाच्या कुटुंबास प्रत्येकी 4 लाख रूपये आर्थीक मदत केली आहे. याबाबतची माहिती आज जिल्हाधिकारी संजय मिना यांनी दिली आहे.

चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील वैनगंगा नदीपात्रातुन काही महिला नावेच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्हयातील देवटोक येथे मिरची तोडणीसाठी जात होत्या. नदीपात्रातील पाण्याची पातडी वाढल्याने काही अंतरावर नाव गेल्यानंतर उलटल्याची दुर्घटना घडली. त्यापैकी एका महिलेस व नावीकास वाचविण्यात यश आले होते. काल 24 जानेवारी पर्यंत तिन महिलांचा मृतदेह हाती लागला त्यात पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे, रेवंता हरिचंद्र झाडे, जिजाबाई दादाजी राऊत यांचा समावेश असुन त्यांना प्रत्येकी चाल लाख रुपायांचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत