गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील २६० व अत्यावश्यक सेवेतील १२७ कर्मचाऱ्यांचे मतदान

गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

अमित साखरे उपसंपादक

गडचिरोली दि.१६ : ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक १३ व गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी येथील गोकुळ नगरातील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील मतदान सुविधा केंद्रात २६० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. तसेच गुरुवार दिनांक १४ ते शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर पर्यंत येथील तहसील कार्यालयातील मतदान सुविधा केंद्रात अत्यावश्यक सेवेतील १२७ कर्मचाऱ्यांचे शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात टपाली मतदान पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. news jagar
निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांने पहिल्या दिवशी बुधवारला १२७ तर दुसऱ्या दिवशी गुरुवारला १३३ मतदारांनी मतदान केले. एकूण २६० निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. यावेळी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या १ हजार ४५ पैकी ७८६ कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यावर असल्याच्या प्रमाणपत्राचे( ईडीसी )वितरण करण्यात आले. ईडीसी प्राप्त कर्मचाऱ्यांना बुधवार,दिनांक २० नोव्हेंबर रोजी जवळच्या मतदान केंद्रात ईडीसी जमा करून ईव्हीएम वर मतदान करता येईल.
अत्यावश्यक सेवेतील एकूण १५९ मतपत्रिका प्राप्त झाल्या. पहिल्या दिवशी गुरुवारला ९५, दुसऱ्या दिवशी शुक्रवारला २३ तर तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी शनिवारला ९ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १२७ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले.
टपाली मतदान सुविधा केंद्रात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कार्यरत निवडणूक कर्तव्यावर व अत्यावश्यक सेवेतील गडचिरोली जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मतदान केले.विधानसभा निवडणुकीत कर्तव्यावर नेमलेले व अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी टपाली मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या नियंत्रणात नेमलेल्या पथकांकडून टपाली मतदान पार पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत