गडचिरोली पोलिसांची चमकदार कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या गर्देवाडा येथे पोलीस दलाने 24 तासात पोलीस ठाण्याची निर्मिती केली. गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही महिन्यात अशा पद्धतीने उभारलेले हे चौथे पोलीस ठाणे आहे.
नक्षल यांचे आश्रयस्थान असलेल्या छत्तीसगड राज्यातील अबूजमाड पासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आता गडचिरोली पोलिसांची सतर्क नजर राहणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच भागात तीन भुसुरुंग स्फोट झाले होते. मात्र यंदा या सर्व संवेदनशील बाबी लक्षात घेता रस्ते बांधणी व 4G मोबाईल टॉवरच्या उभारणीलाही सुरुवात झाली आहे.
सुमारे 200 पोलीस, एसआरपी व सीआरपीएफ जवान नव्याने निर्मित गर्देवाडा पोलीस ठाण्यात तैनात असतील. या पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी 1000 नक्षलविरोधी कमांडो बॉम्ब नाशक व शोधक पथकाची 25 पथके पाचशे विशेष पोलीस अधिकारी गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या पुढाकारात झटत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्देवाडा येथील स्थानिक नागरिकांना दैनंदिन उपयोगाच्या साहित्याचे वितरण देखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले. या नक्षल संवेदनशील व मागास भागात पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे दलाला यामुळे थेट नजर ठेवता येणार आ