गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय सामाजिक
Unique Multiservice
Share

श्री.अमित साखरे, उपसंपादक

गडचिरोली, दि. 22/11/2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के, गडचिरोली 74.92 टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले.

आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरुष मतदार, 1 लाख 31 हजार 710 महिला आणि 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार होते त्यापैकी एक लाख 2 हजार 720 पुरुष, 99 हजार 546 महिला व 1 तृतीयपंथी असे एकूण दोन लाख 2 हजार 267 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.News Jagar

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 54 हजार 610 पुरुष मतदार , 1 लाख 52 हजार 610 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार होते. यातील 1 लाख 16 हजार 704 पुरुष मतदार, 1 लाख 13 हजार 469 स्त्री मतदार तर 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 30 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लक्ष 26 हजार 481 पुरुष मतदार , 1 लाख 24 हजार 974 महिला व 6 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 51 हजार 461 मतदार होते. यातील 95 हजार 511 पुरुष मतदार, 90 हजार 281 महिला मतदार तर 3 तृतीयपंथी असे एकूण 1 लाख 85 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. newsjagar

जिल्ह्यात एकूण 4 लाख 12 हजार 151 पुरुष मतदार, 4 लाख 9 हजार 294 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 8 लाख 21 हजार 455 मतदार होते. त्यापैकी 3 लाख 14 हजार 935 पुरुष, 3 लाख 3 हजार 296 महिला व 5 तृतीयपंथी असे एकूण 6 लाख 18 हजार 236 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत