आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश
नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
दिनांक १० ऑक्टोबर गडचिरोली
गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे . या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.