श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कोरची : – काँग्रेस, उबाठा आणि इतर पक्षातील जवळपास ६० युवकांनी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी कोरची तालुक्यात कृष्णा गजबे यांच्या प्रचार उद्घाटन आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात कोरची येथील तसेच तालुक्यातील मसेली गावातील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमहर्षि प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे लोकसभा समन्वयक किशन नागदेवे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे होते. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे krushna gajbe , आरमोरी विधानसभा समन्वयक श्रीनिवास, शिवसेना शिंदे गटाचे नारायणजी धकाते, भाजप जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, सोहनसिंग मडावी प्रवासी कार्यकर्ते मध्यप्रदेश, कमलनारायण खंडेलवार तालुका उपाध्यक्ष भाजप, बबलू भाऊ हुसेणी जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, संतोष गोंधळे विधानसभा प्रमुख, आसाराम शेंडे, राजेंद्र दीवटे शिवसेना आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. News Jagar
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रमुख नावे फिरोज सोनकुकरा, दुर्गेश सोनकुकरा, दीपक भैसा, डोमेश्वर मडावी, आशिष मडावी, मुकेश जमकातन, भोजराज सोनार, गुरुदेव खोबा, तेजपाल गंधेल, गुलशन सोनकुकरा, लोकेश बागडेरीया, रोशन बागडेरीया, यादव साहळा, आशिष सोनकुकरा, सुभाष भैसा, जितू मडावी, देवा सोनकुकरा, खिलावन मेश्राम, दीपक ठेक, रुपेश चौरे, सुकालू गंधेल, सतिश जुळा, अक्षय बागडेरीया, नरेश जमकालन, हरिचंद जुळा, महादेव जुळा, महेश सोनकुकरा, रामजी सोनार, कलेश जमकातन, चिमन केवाञ, रामसुरामजी मेश्राम, विशाल जांभूळे, सुमुक पुराम, अकालु नंदेश्वर, विनोद वाल्दे, समीर शेंडे, जयदेव सहारे, अरबाज जाडीया, शंकर जनबंधू, धिरज ढवळे, निखील सहारे, भुनेश्वर बघवा, धनराज विनायक, ओमप्रकाश सर्पा, नरेन्द्र बिहेकर, कानकेस सोनपाणी, दीपक ठाकरे, निलादाम विनायक, हेमराज पोरेटी, देविल नैताम, लजन पुराम, किर्तन सोनवाणी, रोशन जनबंधू, विक्रम ठाकरे, संदीप वाल्दे, राजु गुरुपच, एवन गजीर, ज्ञानेश्वर बौरेसरे, सतन सर्पा, जगदीश बघावा, राहुल पुराम यांचा समावेश आहे. कोरची शहर आणि ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद भाऊ चौबे, जिल्हा सचिव भाजप यांनी केले, संचालन प्राचार्य देवराव गजभे, जिल्हा सचिव भाजप यांनी केले आणि आभार नसरुद्दीन भामानी, तालुकाध्यक्ष भाजप कोरची यांनी मानले.