sudhir mungantiwae news jagar

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दुर्गापूर येथे 13 नोव्हेंबरला जाहीर सभा

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ 13 नोव्हेंबर 2024 ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा दुर्गापूर जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी दुर्गापूर येथिल कार्यक्रमाला 13 नोव्हेंबरला उपस्थित राहणार आहे.शक्तीनगर दुर्गापूर येथे डब्ल्यूसीएल कॉलनीजवळील गणेश मैदानात सकाळी 11 वाजता ना. श्री. नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील. news jagar 

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेतील विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजीत केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत