अमित साखरे उपसंपादक
चामोर्शी –
स्थानिक कृषक हॉयस्कूल येथे दिनांक २६ नोव्हेबर मंगळवार ला ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर , प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक मोरेश्वर गडकर , अविनाश भांडेकर , वर्षा लोहकरे , जासुंन्दा जनबंधू , शालू मेश्राम , लोमेश बुरांडे , स्वप्नील बोधनकर , अरुण दुधबावरे तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
मार्गदर्शक मुख्याध्यापक अरविंद भांडेकर यांनी भारतीय संविधान सभेचा इतिहास आणि भारतीय राज्यघटनेचे महत्त्व सांगितले. अध्यक्षांनी भारतीय संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक – मोरेश्वर गडकर यांनी पार पाडले . शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.