काँक्रिट मिक्सर मध्ये सापडल्याने मजुराचा मृत्यू

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

कोरची,ता.29 :

गावात सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करीत असताना काँक्रिट मिक्सरमध्ये हात सापडल्याने कैलास ब्रिजलाल पुळो(२५)रा. बडीमादे या युवा मजुराचा मृत्यू झाला. सदर घटना काळ दि २९ नोव्हेंबर ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील बडीमादे या गावात घडली. news jagar

बडीमादे गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पुणे येथील राजन अँड राज कंपनीतर्फे ११२ मीटर लांबीचा सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात येत आहे. कंपनीमार्फत आंधळी येथील पेटी काँट्रॅक्टर महेश लाडे हे काम करीत आहेत. रस्ता तयार करण्यासाठी काँक्रिट मिक्सर मशिनचा एक नट निघाला. तो पकडत असताना कैलास पुळो याचा उजवा हात मशिनमध्ये अडकला. मशिन सुरु असल्याने हातासह संपूर्ण शरीर मशिनमध्ये गुंडाळले गेले. त्यामुळे कैलासचे डोके आणि पायाला गंभीर दुखापत झाली. छातीच्या बरगड्याही तुटल्या. लागलीच कैलासला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. कोरची पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत