श्री. अमित साखरे, उपसंपादक
* प्रशासनाने प्रवाशी वाहतुकीची समस्या सोडवावी
चामोर्शी:- गेल्या काही दिवसापासून परिवहन महामंडळाच्या बसेसच्या कमतरतेमुळे व वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना तसेच कर्मचारी व नागरिकांना प्रवास करताना मनस्ताप होत आहे. वेळेवर शासकीय कामासाठी कर्मचारी व नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. सायंकाळच्या वेळेस सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेतून बसेसचा वेळापत्रक नसल्याने लवकरच शाळेतून सुट्टी मागून जावे लागत आहे.ही बाब अतिशय खेदजनक असून तसेच यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत शिक्षकाकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष घालून बसेसची संख्या वाढविण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर व शाळा सुटल्यानंतर घरी लवकर पोहोचण्याकरिता बसेस उपलब्ध व्हावे द्यावे अशी मागणी केल्या जात आहे. News Jagar
ग्रामीण भागात मानव मिशन अंतर्गत वाहतुकीची एकमेव सुविधा असलेली बससेवा विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी होती माञ त्याही बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना ये जा करण्यासाठी ग्रामीण भागात कुठलेही वाहतुकीचे साधन नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे .
तरी नवनियुक्त आमदार महोदय यांनी परिवहन महामंडळाकडे लक्ष घालून विद्यार्थी व नागरिकांना होणारा त्रास कसं कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावे. व सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी प्रवासासाठी वाहतूक व्यवस्था करावी अशी मागणी सामान्य करत आहे.newsjagar