एका महिला माओवाद्याने केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

BREAKING NEWS CRIME गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र राष्ट्रीय
Unique Multiservice
Share

वार्तापत्र

जावेद अली गडचिरोली 
दिनांक- 09/11/2024

शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयांचे बक्षिस.

शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 678 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 09 नोव्हेंबर 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे लक्ष्मी बंडे मज्जी, वय 42 वर्ष, रा. कुगलेर, पो. व ता. बेद्रे, भैरमगड, जि. बीजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्याबाबत माहिती

1) लक्ष्मी बंडे मज्जी
 दलममधील कार्यकाळ

 लहान असतांना गावात माओवाद्यांच्या मिटींग दरम्यान गावातील लोकांसोबत माओवाद्यांना जेवन घेऊन जाणे.
 सन 2017 पासुन भामरागड व इंद्रावती एरीया कमिटीमध्ये सि.एन.एम (चेतना नाट¬ मंच) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत.
 दलममध्ये असतांना माओवाद्यांना जेवन पुरवणे तसेच इतर आवश्यक साहित्य पुरविणे इ. काम केले.

 कार्यकाळात केलेले गुन्हे

श्व् अनेक हिंसक घटनांमध्ये तिचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

 

 आत्मसमर्पित होण्याची कारणे.
 दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
 नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
 नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
 दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
 वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
 खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
 चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

 महाराष्ट्र शासनाने हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लक्ष्मी बंडे मज्जी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 30 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

।।।।।।।।।।।।।

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत