मोहड ता.नरखेड गावात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. विजय मधुकर पाचोरी, त्यांची पत्नी माला आणि दोन मुले गणेश आणि दीपक अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक,तर मोठा मुलगा गणेशवर पांढुर्णा येथील बँकेत आर्थिक फसवणुक गुन्हा दाखल होता. त्याला अटकही करण्यात आली होती.
महिनाभरापूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली. तर दुसरा मुलगा दीपक एमपीएससी परीक्षेची तयारी करीत असल्याचे कळते
मात्र कुटुंबातील चारही सदस्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.