आनंदनगर रहिवसींचे मा.आमदार डा. देवराव होळी साहेब यांना निवेदन

गडचिरोली जिल्हा नागपुर महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

आंनदानगर नवेगाव येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण बाबत

गडचिरोली – गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र गडचिरोली येथील. मौजा नवेगाव (पोस्ट सेमाना) ग्रामपंचायत जिल्हा गडचिरोली अंतर्गत पोलीस गृहनिर्माण सह. संस्था पोलीस कर्मचारी यांची आनंदानगर येते २० वर्षापासुन १९२ कुटंबाची वसाहत असुन यातील रस्त्यावर आजतागत आपल्या निधीतून किंवा ग्रामपंचायत मार्फत मुरुम टाकले, पक्के रस्ते किंवा डांबरी करण केलेले नाही त्यामुळे येथील रहीवासीं पोलीस कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावण्या करीता रात्रो बे रात्रो ये-जा करावे लागते. परंतु या परिसरात रोडबांधकाम केलेले नसल्याने पोलीस कर्मचारीयांना आपले कर्तव्य बजावतांना खुप अडी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आनंदानगर येथील रहीवासींची विनंतीचा विचार करुन येथील रस्त्याचे आपल्या निधीतून पक्के खडीकरण व डांबरीकरण या प्रकारची समस्या घेऊन आनंदानगर येथील ताराचंद राऊत, श्रीहरी गौरकार, कृष्णा कोठारी, विजय वासेकर, विलास दर्रो, मनिराम दूग्गा, परमानंद पिंपळे, राकेश मेश्राम, अशोक खोब्रागडे आदि नागरिकांनी आमदार डा. देवराव होळी यांच्या समोर मांडल्या. यावेळी आमदार होळी साहेब यांनी सदर समस्यांचे निराकरण लवकर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत