सर्व पक्षातील नेत्यांची उपस्थिती
जिल्ह्यातील २५ हजाराच्या वर आदिवासी बांधवांची उपस्थिती
गडचिरोली
दि. ६ आक्टोंबर ला आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती गडचिरोली च्या वतीने धनगर तसेच बोगस आदिवासी, १२५०० हजार नौकर भरती, रडखडलेली पेसा भरती या प्रमुख मागण्या सोबतच जिल्ह्यातील अन्य मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित राहून आपल्या एकतेच प्रदर्शन दाखवत जिल्हा प्रशासनाला हादरवून सोडले. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत शहरातील चारही बाजुला ट्राफिक जाम चे दृश्य दिसत होते. यावेळी मोर्चाची तिव्रता बघुन पोलिस विभाग सुद्धा सतर्कता बाळगत पोलिसांची मोर्चेकरांना सांभाळतांना दमछाक होतांनी दिसून आली. सदर मोर्चाची सुरवात शिवाजी महाविद्यालय येथुन दुपारी १.३० झाली. सदर मोर्चाची तीव्रता इतकी होती की मोर्चाच एक टोक जिल्हाधिकारी कार्यालय तर दुसर टोक इंदिरा गांधी चौक असा होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या मोर्चास व उपस्थित जनसमुदायस मार्गदर्शन करतांना खासदार डा. किरसान साहेब यांनी सांगितले की भारतीय संविधाना अंतर्गत आदिवासींना संविधानिक आरक्षण प्राप्त झालेला आहे. परंतु महाराष्ट्रातील राज्य सरकार असवैधानिकरित्या बोगस धनगराला खऱ्या आदिवासींमध्ये समावेश करू इच्छितो आहे.
याविरुद्ध लेखी निवेदन राज्य सरकार केंद्र सरकारकडे सादर केले आहे. तरी येत्या संसदेत याबाबत आवाज उठविणार असं जाहीर केले. तसेच गडचिरोली विधानसभा चे आमदार मा. डॉ. देवराव होळी यांनी सांगीतले कि खऱ्या आदिवासींवर हा अन्यायकारक निर्णय असून धनगरांना जर आरक्षण लागू झाला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन असे जाहीर केले. खऱ्या आदिवासींचा हा महा आक्रोश मोर्चा राज्य शासनाला इशारा देण्याकरिता प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्यात येत असून जर शासनाने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन राज्य भर आदिवसी समाजाच्या वतीने केला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवानी एकसंघ भावनेने आंदोलनात सामील व्हायचे तेव्हा आपण तीव्र आंदोलनासाठी तयार राहावे असे उपस्थित समस्त बंधू-भगिनींना आव्हान करण्यात आले. या मोर्चाला जाहीर पाठिंबा शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राज्य सरकारी कर्मचारी संघटना इत्यादी जिल्ह्यातील पक्ष व संघटना यांनी या आयोजित खऱ्या आदिवासींच्या महा आक्रोश मोर्चाला व मागणी ला जाहीर पाठिंबा दिलेला आहे यावेळी मोर्च्यास उपस्थित आदिवासी बांधवांना माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सोनल कोवे, विश्वजीत कोवासे, माधुरी मडावी, डॉ. शिलू चिमुरकर, भाग्यश्री आत्राम, डॉ. आशिष कोरेटी, रामदास मसराम, डॉ. नीलकंठ मसराम, गोविंद टेकाम, विनोद मडावी, एन झेड कुमरे, सैनू गोटा, नंदू नरोटे,भरत येरमे, कोवे महाराज, क्रांती केरामी, लालसु नागोटी, जयश्री वेळदा, वसंत कुलसंगे, ऋषी पोर्टेट, फरेंद्र कुतिरकर, धीरज मडावी नितीन पदा यानी सुद्धा मार्गदर्शन केले.
सदर निघालेल्या आदिवासी महा आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सौ पुष्पलता कुमरे, गुलाबराव मडावी, सदानंद ताराम, अमरसिंग गेडाम, उमेश् उईके, आनंद कंगाले, वनिशाम येरमे, आनंद मडावी, देवराव अलाम, नामदेव उसेंडी, ऋषी होळी, गणेश कोवे, शिवराम कुमरे, अमोल कुडमेथे, सुरज मडावी, चरणदास पेंदाम, आरती कोल्हे, जयश्री येरमे, माधवराव गावड, प्रशात मडावी, डॉ मनोहर मडावी यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम प्रास्ताविक सदानंद आराम आभार प्रदर्शन गुलाबराव मडावी