◊ पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क तसेच अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असावेत मधुर संबध म्हणून कारवाईस विलंब होत असल्याची शंका
एक महिला सामाजिक कार्यकर्ता अवैध दारु अड्डयांवर जाऊन अवैध दारु विक्री सुरु असल्याचे पुरावे ठाणेदार सुनील गाडे, एस पी मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक यांना पाठविते एवढेच नाही तर लेखी तक्रार सुद्धा देते पण अवैध दारू विक्रेत्यांवर कोणतीही कार्यवाही होत नाही तर या बदल्यात तक्रार कर्त्याचे संपूर्ण माहिती अवैध दारू विक्रेत्यांना पुरविण्यात अली असल्याची माहिती प्रियाताई झांबरे यांनी सांगीतली .
महाराष्ट्रात निवडनुकांचा माहौल सुरु असतांना देखील बल्लारपुर शहरात तसेच बामणी, दहेली कळमणा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु आहे परंतु चंद्रपुर चे पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन साहेब यांच्या निदर्शनास येऊन देखील अद्याप अवैध धंद्यावर आळा बसला नाही. बल्लारपुर पोलीस नेहमी अवैध व्यवसायाला आळा घालण्याऐवजी त्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप प्रियाताई झांबरे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे
पोलीस स्टेशन बल्लारपुर मध्ये सर्वसाधारण लोकांच्या तक्रारीवर पोलीस कारवाई करत नाही. माहिती अधिकार अर्जांवर माहिती देण्यास असमर्थ आहेत , मात्र अवैध दारुचे व्यवसाय करणाऱ्यांपैकी लोहकरे यांनी डिबी पोलीस पैसे घेऊन दारु विक्री करु देतात असे सांगीतले.तसेच झांबरे ताई यांनी अवैध दारु भट्टी सुरु असल्याची माहिती दिली असे सांगुन अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांना प्रियाताई झांबरे यांचे बद्दल सांगीतले पोलीसांनी माहिती गोपनीय ठेवण्या ऐवजी दारु भट्टी चालविणाऱ्या लोकांना सहकार्य केले.
लोहकरे यांनी डिबी पोलीस पैसे घेऊन अवैध धंदे करु देतात असे देखील सांगीतले, लोहकरेच नाही तर इतरही दारुचे धंधे करणाऱ्यांनी कबुली दिली, लोहकरे यांना बेद्दम मारले म्हणुन बाकीचे लोकांचे काही विडियो मिडीया समोर आणने कठीन झाले. मोठी तगडी रक्कम अवैध दारु भट्टी मालकाकडुन घेतल्या जाते आणी केस सुद्धा केल्या जाते जेनेकरुन पोलीस नामानिराळी, बल्लारपुर शहरातच नाही तर बामणी, दहेली, कळमणा इतर गावातही दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बल्लारपुर शहरात जवळपास पन्नास ते साठ लोकांचा अवैध दारु व्यवसाय आहे , या भट्टया बंद होणे गरजेचे आहे असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले. प्रियाताई झांबरे यांनी पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क विभागाच्या पलिकडे जाऊन कर्तव्य निभावले आहे. ज्या प्रमाणे पोलीस तात्पुरती अवैध भट्टी बंद करुन अवैध व्यवसायाला आळा घालण्याचे नाटक करतात त्यावर आदर्श मिडीया एसोसिएशन ची नजर असल्याचे सांगीतले..अवैध व्यवसाय करणारे पोलीस प्रशासन आणी उत्पादन शुल्क विभागला हफ्ता बांधला असल्यामुळे बल्लारपुरातील अवैध व्यवसायाला आळा लागणे कठीण दिसत आहे.
झांबरे यांच्या जिवाला धोखा निर्माण होण्याची शक्यता आहे आणी याला जबाबदार पोलीस विभाग आणी उत्पादन शुल्क विभाग राहतील असे प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले. जर अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस विभागांनी आणी उत्पादन शुल्क विभागांनी प्रामाणिक पणे कारवाई केली नाही तर प्रियाताई झांबरे ह्या पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात उपोषणाला बसतील असेहि सांगीतले. पोलीस विभागात आणी उत्पादन शुल्क विभागात काही गैरजिम्मेदार पोलीस कर्मचारी आणी अधिकारी असल्यामुळे आदर्श आचारसंहिता सुरु असतांना देखील बल्लारपुर शहरामध्ये तसेच तालुक्यात अवैध दारु व्यवसाय सुर आहे आणी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने दारु सप्लाई होत आहे असे देखील प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले.
प्रियाताई झांबरे यांच्या या तक्रारीमुळे अवैध दारू व्यवसायिकांकडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे .
बल्लारपुर शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात अवैध दारु सप्लाई करणाऱ्या महागुरु चे नाव लवकरच उजागर करणार असल्याचेही सांगितले
चंद्रपुर चे पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन तसेच उत्पादन शुल्क चे अधिक्षक नितीन धार्मिक हे होलसेल व चिल्लर बिना परवाना दारु व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करुन कायमस्वरुपी दारु भट्टया बंद करतील काय?? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.