अहेरी विधानसभा क्षेत्रात चौरंगी लडत

गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी राजकीय सामाजिक
Unique Multiservice
Share

जावेद अली गडचिरोली

अहेरी विधानसभा हे अति मागास नक्षल ग्रस्त व छतीसगड. तेलणगान. सीमेवर असलेला तालुका म्हणजे अहेरी विधानसभा क्षेत्र होय. या अहेरी विधानसभा शेत्रात आज च्या घडीला 11/12 उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावीत आहे. मात्र या ठिकाणी माजी आमदार अपक्ष उमेदवार टेबल या चिनावर उभे असून मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अजितदादा पवार गट घडी या चिनावर उमेदवार आहे तर मुलगी भाग्यश्री ताई आत्रम ही शरद पवार गटातून तुतारी या चिन्हावर उभी आहे. तसेच माजी पालक मंत्री राजे अमरीश आत्रम हे अपक्ष उमेदवार ऑटो चिन्हावर उभे असून संदीप कोरेत हे मनसे चे चिन्हा वर उभे आहे व इतर उमेदवार तसेच पेंटारामा तलांडी यांची मुलगी नीता तलांडी ही सुद्धा अपक्ष उमेदवार आहे.
या मंत्री धर्मराव बाबा आत्राम व मुलगी या आमने सामने असून धर्मराव बाबा आत्राम यांना भाग्यश्री ताई आत्रम यांच्या मुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. तर राजे अमरीश आत्राम यांना संदीप कोरेत मनसे मुळे मोठा धोका निर्माण झाल्याची चर्चा अहेरी विधानसभा क्षेत्रात सुरु आहे. या लडाईत माजी आमदार दीपक दादा आत्राम यांची वर्नि लागण्याचे चिन्ह दिसत असून चर्चेला उधाण आले आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम अजितदादा पवार यांच्या तून वेगडे होहून शरद पवार गटात भाग्यश्री ताई आत्राम वेगडे होऊन निवडणूक लडत असल्याने एकाच पक्षातील दोन गट निर्माण झाले आहे. या मुळे धर्मराव बाबा आत्रम यांना जे मत येणार होते ते भाग्यश्री ताई आत्रम घेऊन वडिलांचे नुकसान करू शकेल म्हणजे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मोठी हार बघायला मिडत आहे तर राजे हे भाजप चे माजी मंत्री होते तर संदीप कोरेत हे भाजप चे भाजपा आदिवासी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष होते यावेळी संदीप कोरेत भाजपा लां राम राम करून मनसे मध्ये प्रवेश केले असले तरी भाजपचा काही चहाता वर्ग संदीप कोरेत सोबत असल्याने राजे अमरीश यांचा मोठा नुकसान होण्याची चर्चा सुरु आहे तसेच अहेरी विधानसभा शेत्रात 11/12 जे अपक्ष उमेदवार विधानसभा च्या रिंगणात उभे आहे ते सुद्धा राजे अमरीश आत्रम व मंत्री धर्मराबाव आत्रम यांचेच वोट मतदान खाणार असून राजे व मंत्री धर्मरावबाबा यांना मोठा नुकसान होऊन माजी आमदार दीपक दादा आत्रम हेतर बाजी मारणार तर नाही ना?? अशी चर्चा अहेरी विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत