मानव तस्करी विरोधी युनिटची कार्यवाही
दोन वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या ३२ वर्षीय वॉचमनला गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे
सदर अल्पवयीन मुलगी ऑक्टोबर 2022 मध्ये बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कशोशीने तपास केला पण चंद्रपूर तर कधी हैदराबाद असा स्थान बदल झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
मानव तस्करी विरोधी युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांना सीताबर्डी येथील एका बांधकाम स्थळावरून ताब्यात घेण्यात आले, आरोपी वॉचमनला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.