श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कोरची मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावर दोन दुचाकी मध्ये समोरा समोरील धडक होऊन अपघात झाल्याची माहिती आमदार कृष्णा गजबे यांना मिळताच. आमदार कृष्णा गजबे हे प्रत्यक्ष अपघात ठिकाणी धाव घेत. या अपघातात एका महिलांचा जागीच मृत्यू झाला त्या महिलेच्या पार्थिवावर स्वतःच्या गाडीतून शाल आणून पार्थिवावर स्वतः आमदार कृष्णा गजबे यांनी शाल झाकुन अपघातात जखमी झालेल्या इतर व्यक्तींना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरित हलवून स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची भेट घेतली.