विनोद खोब्रागडे vinod khobragade

अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांचा वरोरा-भद्रावती व चंद्रपूर मतदारसंघातून डोअर टू डोअर प्रचार सुरू

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपुर महत्वाची बातमी राजकीय सामाजिक
Unique Multiservice
Share

अनेक राष्ट्रीय राजकीय पक्षाचे नेतेमंडळी, मतदार राजाला, फुकटचे देन्यासाठी, चढाओढ सुरू केलेली दिसत असून अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे यांनी मात्र मतदार बांधवांना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी, आपल्या गावाचा, शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या, विकास करन्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यांनी जपान या देशाचे उदाहरण देत लहानसा जापान देश, भारतापेक्षा १०० वर्ष पुढे, आर्थिक प्रगती प्रथावर आहे,कारण तिथे लहान मोठे नागरिक श्रम करतात, फुकट घेत नाही व देत नाही, म्हणून तो देश प्रगतीपथावर आहे, असे म्हटले आहे .आपल्या राज्यात, देशात सरकार फुकटचे देऊन जनतेला आळशी, लाचार, भिकारी, बनवित आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. vinod khobragade

अपक्ष उमेदवार विनोद कवडुजी खोब्रागडे हे दोन मतदार संघातून उभे आहेत , ७५ वरोरा -भद्रावती मतदारसंघामध्ये त्यांना ” रोड- रोलर ” हे चिन्ह मिळाले आहे. तर ७१-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात त्यांना “कोट” हे चिन्ह मिळाले आहे. News Jagar

अपक्ष उमेदवार संघर्षी विनोद कवडुजी खोब्रागडे हे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांसाठी न्याय व हक्कासाठी लढण्याकरिता प्रसिद्ध असून न्यायालयात स्वत: आर्गुमेंन्ट करुन, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात .त्यांनी उघडकीस आणलेल्या लाखो करोडो रुपये भ्रष्टाचाराचे फाईल मंत्रालय मुंबई येथे बंद आहेत, त्या सर्व फाईल उघडण्यासाठी जनतेनी त्यांना एकदा संधी द्यावी असे मत न्यूज जागर प्रतिनिधी शी बोलतांना त्यांनी व्यक्त केले आहे .तसेच आमदार कसा असावा याचा निर्णय जनतेनी घेत असतांना अमूल्य मत हे पैशासाठी न विकता समाजहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी, १००% मतदान करावे, व हे मतदान करणे हे राष्ट्रीय अधिकार व कर्तव्य आहे, आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत