सोनू वाळके,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी :- नागपूर चक शाळेच्या दुरावस्थामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसानीची शक्यता
शिक्षण विभागाचा कानाडोळा
वर्ग पाच, शिक्षक दोन, विद्यार्थी चोवीस , चिमुकले कसे शिकत असतील
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नागपूर चक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून या दुरावस्थामुळे शैक्षणिक नुकसान होत असून त्या वर्गखोल्यात चिमुकले कसे बसत असतील?, तर त्या शाळेत “वर्ग पाच शिक्षक दोन, विद्यार्थी चोवीस “तेथे शिक्षण घेणारे चिमुकले कसे शिक्षण घेत असतील? हा चिंतनाचा विषय असून या कडे जिल्हा परिषद प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे
या पंचायत समिती अंतर्गत येत असलेली नागपूर चक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फार जुनी असून या शाळेत इयत्ता एक ते पाच पर्यंत वर्ग सुरू आहेत शाळा इमारतमध्ये. चार वर्ग खोल्या आहेत त्या खोल्यांची दुरावस्था झाली असून शाळेतील फरशी बघा, विद्यार्थी कसे बसत असतील विचार करा , शाळेतील वर्ग खोल्यात खड्डे पडले आहेत, कधी साप ,विंचू निघु शकते तर पावसाचे दिवस आहे, शाळा इमारत मधील स्टेज वर काळी कचरा दिसून येत आहे. शाळेला रंगरगोटी ही नाही तर शाळेच्या नळाला जंग लागला असून पाण्याची टाकी पाईप लाईन फुटली आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजू वासमवार द्वारा त्या मुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे आदी दुरावस्था, व स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . ही चिमुकले कसे शाळेत बसत असतील शैक्षणिक कार्य कसे पार पाडले जात असतील आणि शिक्षकही एक ते पाच पर्यंत कसे शिकवत असतील पोर काय शिकत आहेत हा संशोधनाचा व आत्मचिंतन करणारा प्रश्न उपस्थित होत आहे. तर शाळेला संरक्षण भिंत आहे पण गेट नाही शाळा इमारत आहे पण दरवाजे तुरफुट आहेत, अशी अवस्था शाळेची झाली आहे तर मुख्याध्यापक इयत्ता एक ते दोन वर्ग तर तीन ते पाच पर्यंत एक शिक्षिका घेत आहेत. पोरांना
शिक्षण कसे मिळत असेल याची कल्पना करणे गरजेचे आहे. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन असते ते शाळेच्या सोयी सुविधा व इतर बाबतीत सतर्कता बाळगूण पंचायत समिती शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्याची गरज आहे मात्र तेही ते करत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही
कोट(पालक)- शासकीय शाळा म्हणून मी माझी मुले या शाळेत दाखल केलो आहे पण शाळेतील दुरावस्था पाहून मुलांना काढून बाहेर शिक्षण द्यावे असे वाटत आहे यासाठी याची पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी दखल घेऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी अपेक्षा आहे
निलेश गोहणे पालक, नागपूर चक
— शाळेतील दुरावस्था व स्वच्छतेच्या बाबतीत सतर्कता बाळगूण सतत मुख्याध्यापक द्वारा पाठपुरावा करण्यात येत आहे पण या कडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे
राजू वासमवार, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, नागपूर चक
— विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे, पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्याची काळजी घेण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आली आहे.
हेमंत चावरे , केंद्र प्रमुख, लखमापूर बोरी.
